नांदेड,(प्रतिनिधी)-कंधार पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत एका पोलिस अंमलदाराने पोलीस कॉलनी कंधार येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. केंद्रे यांच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.
कंधार पोलीस ठाण्यात राम किशन केंद्रे (57) बक्कल नंबर 1171 हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांचे वास्तव्य कंधार येथील पोलीस कॉलनी मध्येच होते. रात्री त्यांनी स्वतःला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चे फोटोज बऱ्याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी आणि मुलगा असा परिवार असल्याचे सांगण्यात आले. त्यांची मुलगी RAF या संस्थेत कार्यरत आहे. राम किशन केंद्र यांचे मूळ गाव गोळेगाव हे आहे. काही दिवसांपासून रामकिशन केंद्रे हे कर्करोगाने सुद्धा पीडित होते असे सांगण्यात आले. वास्तव न्यूज लाईव्ह परीवार राम किशन केंद्रे यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
Useful news Thanks team 🙏🏻🙏🏻🙏🏻