नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ३७ व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा दिमाखदार समारोप व बक्षीस वितरण सोहळा २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता पोलीस मुख्यालय नांदेड येथील कवायत मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडला. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान रंगलेल्या या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत पोलीस मुख्यालय नांदेड संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन समारोप सोहळ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर प्रास्ताविक व स्वागत नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले.प्रास्ताविक करताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदारांना दैनंदिन तणावपूर्ण कर्तव्यातून विरंगुळा मिळावा, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांच्यात सांघिक भावना वाढीस लागावी, या मुख्य उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य पाहुणे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी खेळाडूंचे कौतुक करताना प्रतिपादन केले की, सामान्य नागरिक जेव्हा शांत झोपतो, तेव्हा खाकी वर्दीतील सुदृढ पोलीस दलातील प्रत्येक जवान डोळ्यात तेल घालून जिल्ह्याचा पहारा देत असतो. सण-उत्सव, निवडणुका किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात पोलिसांवर मोठा ताण असतो. अशा २४ तासांच्या धावपळीत शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे खेळ होय. खेळाच्या मैदानावर कोणीही हरत नसतो; एकतर तुम्ही जिंकता किंवा काहीतरी नवीन शिकता, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थित खेळाडूंना दिला. स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि क्रीडा प्रकार या तीन दिवसीय स्पर्धेत ४० महिला आणि १०० पुरुष अशा एकूण १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत ७ सांघिक खेळांसोबतच हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो-खो तसेच ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, ज्युडो, कुस्ती, तायकवांदो, वेटलिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, पॉवर लिफ्टिंग आणि स्विमिंग यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपले नैपुण्य दाखवले. स्पर्धेचा सविस्तर निकाल: सर्वसाधारण विजेतेपद: पोलीस मुख्यालय, नांदेड १०० मीटर धावणे – पुरुष गट: प्रथम क्रमांक: मंगेश दळवे – पोलीस मुख्यालय, नांदेड द्वितीय क्रमांक: धनंजय तुपे – जलद प्रतिसाद पथक, नांदेड १०० मीटर धावणे – महिला गट: प्रथम क्रमांक: संतोषी पंदीलवाड – पोलीस मुख्यालय, नांदेड द्वितीय क्रमांक: रोहिणी चारले – पोलीस मुख्यालय, नांदेड सांघिक खेळांचे अंतिम निकाल: हॉकी – पुरुष: नांदेड शहर विभाग फुटबॉल – पुरुष: पोलीस मुख्यालय, नांदेड व्हॉलीबॉल – पुरुष: कंधार विभाग बास्केटबॉल – पुरुष: पोलीस मुख्यालय, नांदेड हँडबॉल – पुरुष: नांदेड शहर विभाग कबड्डी – पुरुष: पोलीस मुख्यालय, नांदेड खो-खो – पुरुष: पोलीस मुख्यालय, नांदेड व्हॉलीबॉल – महिला: पोलीस मुख्यालय, नांदेड बास्केटबॉल – महिला: कंधार विभाग कबड्डी – महिला: पोलीस मुख्यालय, नांदेड खो-खो – महिला: पोलीस मुख्यालय, नांदेड सोहळ्याची सांगता व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक गृह सुनील माने, शहरातील सर्व पोलीस निरीक्षक, पंच आणि शिक्षक उपस्थित होते. खेळाडूंच्या शिस्तबद्ध संचलन व मानवंदनेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना व खेळाडूंना चषक आणि बक्षीसांचे वितरण करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक गृह यांनी आभार प्रदर्शन केले, ज्यानंतर रिट्रीट, ध्वज हस्तांतरण आणि मिगलिंगने या क्रीडा सोहळ्याची दिमाखदार सांगता झाली. Kanthak Suryatal Post Views: 61 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड रेल्वे विभागात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा नांदेड पोलीस दलातील ५ अधिकारी-अंमलदारांना सन्मानपूर्वक निरोप