नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका टाटा एस टेम्पोवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ गोवंशीय कारवडी आणि टाटा एस टेम्पो असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास इतवारा पोलीस ठाण्याचे पथक पहेलवान टी हाऊस परिसरात गस्त घालत असताना, गुप्त बातमीदाराकडून विश्वसनीय माहिती मिळाली. विनकर कॉलनी कमानीसमोर व पिवळी बिल्डींगसमोर, इतवारा येथे एका टाटा एस टेम्पोमधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे समजताच पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन सायंकाळी ७:२५ वाजता घटनास्थळी छापा टाकला. चालकाला अटक, एक आरोपी फरार पोलीस पथकाने टेम्पो अडवला असता, वाहनातील एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. अटक केलेला चालक: मारोती मनोहर किरतवाड, वय ४६ वर्षे, व्यवसाय: चालक, रा. पातालगंगा ता. कंधार जि. नांदेड, हल्ली रा. मल्हाळ चौक, तरोडा, नांदेड. फरार आरोपी: अब्दुल हमीद कुरेशी, वय ५० वर्षे, रा. पिवळी बिल्डींग शेजारी, चौफाळा, नांदेड. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ७०,००० रुपये किंमतीची १ बांड्या रंगाची गोवंशीय जातीची कारवड, वय अंदाजे ४ वर्षे. ६०,००० रुपये किंमतीची १ बांड्या रंगाची गोवंशीय जातीची कारवड, वय अंदाजे ४ वर्षे. ३,२०,००० रुपये किंमतीचा १ क्रीम रंगाचा टाटा एस कंपनीचा टेम्पो, क्रमांक MH-26-BE-3251. एकूण जप्त रक्कम: ४,५०,००० रुपये. गुन्हा दाखल व कायदेशीर कायदे जनावरांना वाहनामध्ये अत्यंत कमी जागेत, क्रूरतेने डांबून इजा पोहोचवून अवैध मार्गाने कत्तलीसाठी नेले जात असल्याने, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी रामकिशन हिंगणकर, पोकॉ १३२७, इतवारा पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर खालील कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली आहे: महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६ चे कलम ५ अ, ९ प्राणी क्रौर्य प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(ड), ११(१)(ई) कारवाई करणारे पोलीस पथक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनात,पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे आणि पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड, कदम, शेळके, कोरनूळे आणि बालाजी हिंगणकर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. Kanthak Suryatal Post Views: 39 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; रस्तालूट, घरफोडी अन् दुकानातून २७ हजारांची चोरी मानसिक त्रासाला कंटाळून ४२ वर्षीय व्यक्तीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल