बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांचा हात साफ; भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरातील तथागत नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले ६० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत तथागत नगर, नांदेड येथे घडली. फिर्यादी विठ्ठल पांडुरंग गोडबोले (वय ६६, रा. तथागत नगर, नांदेड) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले ६० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी फिर्यादी विठ्ठल गोडबोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीप्रकरणी पोलीस कर्मचारी पोहेकॉ/तोडमास तपास करीत आहेत. शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!