११ लाखांचा मुद्देमाल जप्त; निलंगा पोलिसांत गुन्हा दाखल लातूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पाठविलेल्या विशेष पथकाने निलंगा येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या १३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, ११ लाख २ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली. नांदेड परिक्षेत्रांतर्गत लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी आपल्या अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी परिसरात विठ्ठल वाघमोडे यांच्या पत्र्याच्या शेडसमोर सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. या कारवाईत ४३ हजार ६५० रुपयांची रोकड, १३ मोबाईल फोन आणि १० मोटारसायकली असा एकूण ११ लाख २ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राणा विनोद आर्य, सचिन संजय मोघे, अमर विश्वनाथ सूर्यवंशी, समीर मेहबुब बागवान, शैलेश प्रल्हादराव आर्य, सलीम मेहबुबसाब कुरेशी, संतोष व्यंकटराव खडके, बलभीम शेषेराव कांबळे, अभिलाष अशोक सोनकांबळे, योगेश चंद्रकांत कांबळे, अनिकेत अशोक सोनकांबळे, शिवाजी व्यंकटराव गंम्पले आणि सोमनाथ रावसाहेब जाधव या १३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. अवैध व्यवसायांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ९१५०१००१०० हा क्रमांक असलेली ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधून अवैध व्यवसायांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 87 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जय भवानी चौकात २.३५ लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक वसुलीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही; सावकारांना पोलीस उप महानिरीक्षकांचा सज्जड दम