स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील घटना; ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला अडवून तीन अनोळखी इसमांनी संगनमताने लुटल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मोबाइल आणि सोन्याची पोत असा एकूण २३ हजार ८८७ रुपयांचा ऐवज हिसकावून आरोपी पसार झाले. याप्रकरणी फिर्यादी धोंडिबा शंकरराव बासटवार (वय ४२, रा. गुरुजी चौक, पूर्णा रोड, नांदेड) हे आपल्या बहिणीसह मोटारसायकलवरून जात होते. यावेळी विद्यापीठ परिसरात तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांना अडवले. त्यानंतर फिर्यादीजवळील विवो कंपनीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि त्यांच्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याची पोत, ज्याची किंमत १३ हजार ८८७ रुपये आहे, असा एकूण २३ हजार ८८७ रुपयांचा ऐवज हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर फिर्यादी धोंडिबा बासटवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी पोलीस अंमलदार बाघमारे करीत आहेत. विद्यापीठ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 202 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूरमध्ये सोन्याच्या अंगठ्या पळवून वृद्धाची फसवणूक; ७० हजारांचा ऐवज लंपास ; तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल