माळाकोळी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; संगनमताने चोरी केल्याचा आरोप माळाकोळी (प्रतिनिधी) – लोहा तालुक्यातील हिराबोरी तांडा शिवारात शेतातील सोयाबीन पिकाची चोरी झाल्याची घटना १६ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान घडली. या प्रकरणात सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोयाबीन पीक चोरून नेल्याची फिर्याद माळाकोळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिराबोरी तांडा, ता. लोहा येथील शेतकरी इंद्रजित दिगांबर राठोड (वय ३९) यांच्या शेतातील सोयाबीन पीक चोरीला गेले. या प्रकरणी किशन नामदेव राठोड, प्रवीण नामदेव राठोड, सुताबाई किशन राठोड आणि चंद्रकला प्रवीण राठोड (सर्व रा. हिराबोरी तांडा, ता. लोहा) यांनी संगनमत करून शेतातील सोयाबीन पीक चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.या चोरीमुळे शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शेतातील पिकांची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी इंद्रजित दिगांबर राठोड यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३०२(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बोंबले करीत आहेत. शेतातील सोयाबीन पिकाची चोरी नेमकी कशी झाली आणि त्यामागील इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 62 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कुंडलवाडीत तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांविरुद्ध गुन्हा;१ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन दुचाकींसह रोख रक्कम हस्तगत कांंकाडी शिवारात सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीकडून आग; २ लाख ४० हजारांचे नुकसान