नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून महसूल बुडवून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशाविरुद्ध नांदेड पोलीस दलाने मोठी धडक मोहीम राबवली आहे. नांदेड ग्रामीण, मुदखेड आणि विमानतळ पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ९ मोठ्या बोटी, १ लहान बोट, इंजिन, २३ तराफे, १ टिप्पर आणि ६० ब्रास रेती असा एकूण ३ कोटी १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे. कारवाईचा सविस्तर तपशील नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी माणिक बेल्ले यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, मुदखेडचे पोलीस निरीक्षक गणेश कराड आणि विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या पथकांनी गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकले. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील: ९ मोठ्या लोखंडी बोटी: जिलेटिनच्या काड्यांचा वापर करून जागेवरच स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आल्या. १ लहान बोट: जागेवरच नष्ट करण्यात आली. १ इंजिन: अंदाजे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे रेती उपसा करणारे इंजिन जागेवरच नष्ट करण्यात आले. २३ रेती उपसा तराफे: १४ लाख ४० हजार रुपये किंमतीचे तराफे जाळून आणि नदीच्या पात्रात बुडवून नष्ट करण्यात आले. ६० ब्रास रेती व १ टिप्पर: अंदाजे १२ लाख १० हजार रुपये किंमतीची रेती आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा १ टिप्पर जप्त करण्यात आला. कायदेशीर कारवाई व पोलिसांचा इशारा या कारवाईप्रकरणी नांदेड ग्रामीण, मुदखेड व विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.नदीपात्रातून बेकायदेशीर उपसा करून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या आणि शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांची कोणतीही गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा प्रकारची विशेष मोहीम यापुढेही अविरत चालूच राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 101 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किनवटच्या मदनापूर परिसरात रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृतदेह; वनविभागाकडून तपास सुरू