नांदेड (प्रतिनिधी) – ॲड. पंचशील विक्रमराव कांबळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६(१)(ब) अन्वये सुरू असलेली हद्दपारीची कार्यवाही ही आकस बुद्धीने प्रेरित असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी नांदेड अभिवक्ता संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नांदेड अभिवक्ता संघ, जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड यांच्या वतीने दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे निवेदन सादर करण्यात आले. ॲड. पंचशील विक्रमराव कांबळे हे नांदेड अभिवक्ता संघाचे सक्रिय सदस्य असून जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड तसेच संबंधित न्यायालये आणि तालुका स्तरावरील कनिष्ठ न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६(१)(ब) अन्वये सुरू करण्यात आलेली कार्यवाही ही आकस बुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप नांदेड अभिवक्ता संघाने केला आहे. सदर हद्दपारीच्या कार्यवाहीमुळे ॲड. पंचशील कांबळे यांच्या वकिली व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, त्यांच्या व्यवसायाच्या तसेच उपजीविकेच्या अधिकारावर गदा येत आहे. त्यामुळे सदर कार्यवाहीचा फेरविचार करून ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदनावर नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. यदूपत अर्धापूरकर, उपाध्यक्ष ॲड. संगमेश्वर देलमाडे, महिला उपाध्यक्ष ॲड. दिपाली डोणगावकर (गोरे), सचिव ॲड. कपिल पाटील गाडेगावकर, महिला सहसचिव ॲड. सुजाता बगाटे, कोषाध्यक्ष ॲड. मंगेश जामनिक, विशिष्ट सहाय्यक ॲड. प्रदीप राठोड, कार्यकारिणी सदस्य ॲड. कार्तिक बोकारे, स्वीकृत सदस्य ॲड. जावेद खान पठाण तसेच नांदेड अभिवक्ता संघाच्या इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन नांदेड अभिवक्ता संघाच्या वतीने ॲड. भिमरत्न कांबळे यांनी निवासी जिल्हाधिकारी श्री. किरण आंबेकर यांच्याकडे सादर केले. Kanthak Suryatal Post Views: 104 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड शहर मंडळात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान उत्साहात संपन्न