नांदेड ( प्रतिनिधि)-नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी व गंभीर गुन्ह्यातील पाहिजे,फरारी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराया यांना आदेश केले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकांना पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेण्यास सांगितले.
दिनांक 10 मे 2024 रोजी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार लालवाडी पुलाजवळ एक जण गावठी पिस्टल बाळू असल्याची खात्री लाईक माहिती मिळाल्याने ही माहिती वरिष्ठाला कळवून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेत नव्याने रुजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयाड यांना कळवली तसेच कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक साईनाथ पूयड व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस अंमदारांनी सांगितली की अतीश विष्णू सूर्यवंशी वय 23 वर्ष व्यवसाय बेकार राहणार लालवाडी ब्रिज बाजूस शिवाजीनगर नांदेड याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून बेकायदेशीर रित्या बाळगलेली एक पिस्टल व एक मोबाईल असा एकूण 30000 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. सदरील आरोपी हा भाग्यनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा क्रमांक 272/2023 कलम 307, 326, 143 ,147,149 भादवी 2, पोलीस स्टेशन शिवाजीनगर गुन्हा क्रमांक 147/2024 कलम 324, 504 34 भादविनुसार गुन्हा दाखल आहे.
या कामगिरीबद्दल नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराया धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हाशाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय,पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पूयड, पोलिस अंमलदार माधव केंद्रे, गुंडराय करले, दीपक पवार, किशन मुळे ,देवा चव्हाण ,गजानन बैलवाड ,मोतीराम पवार ,ज्वालासिंग बावरी, महेजबिन शेख यांचे कौतुक केले.