नांदेड (प्रतिनिधी): -शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी सुजल स्मृतीशेष उदय गोडबोले (वय २३ वर्षे) यांचे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी अपघातानंतर उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने गोडबोले कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. सुजल गोडबोले हे केंद्रीय राखीव दलात मेजर पदावर कार्यरत असलेले स्मृतीशेष उदय गोडबोले यांचे सुपुत्र होते. अल्पवयातच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुजल यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्यावर नांदेड येथील शांतीधाम, गोवर्धनघाट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहीण, मेहुणा असा परिवार आहे. एलआयसीचे विमा प्रतिनिधी सुभाष गोडबोले आणि युवा उद्योजक प्रवीण गोडबोले यांचे ते पुतणे होत. तसेच भारतीय जनता पार्टी महानगर, नांदेडच्या सरचिटणीस सुषमाताई थोरात (पंडित) यांचे ते मामेभाऊ होते. सुजल यांच्या अकाली निधनाने गोडबोले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 350 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किरकोळ वादातून तरुणावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला