नांदेडच्या विमानतळ परिसरातील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, एक आरोपी ताब्यात नांदेड (प्रतिनिधी) – किरकोळ वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास नांदेड येथील फ्रूट मार्केटजवळ एजाज भाई यांच्या टाईल्सच्या दुकानासमोर ही घटना घडली. शेख गौस शेख माजिद, मलिक (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कामठा) आणि सय्यद हानिफ ऊर्फ हनी शेख जाफर (रा. महेबूबनगर, नांदेड) हे आपापसांत शिवीगाळ करत होते. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी गेले असता, आरोपींनी त्यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपींनी हातावर व पायावर मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सैफ अली अख्तर अली (वय २१, रा. बौद्धविहार, आंबानगर, सांगवी, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१४/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०९(१), ११८(१), ३५१(२)(३), ३५२ आणि ३(५), तसेच शस्त्र कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे करीत आहेत. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींना पकडण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू आहे.किरकोळ वादाचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 135 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दसऱ्यापुर्वी नांदेड पोलीस दलात दोन-तीन खंडीपेक्षा जास्त मोदकांचे ठेकेदार मुख्यालयात जमा होणार ? सुजल गोडबोले यांचे अपघाती निधन; उद्या सकाळी अंत्ययात्रा