नांदेड(प्रतिनिधी)-दि.16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांमध्ये स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानतिर्थ-2026 हा युवक महोत्सव साजरा होणार आहे. याची माहिती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.राजपालसिंह चिखलीकर, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, युवक महोत्सवाचे सचिव प्रशांत सुतकर, सहसचिव डॉ.अश्र्विन बोरीकर यांनी पत्रकारांना दिली. या कार्यक्र्रमाचे उद्घाटन मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप मराठी अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या उपस्थित होणार आहे. या युवक महोत्सवात कोणताही झगमगाट न ठेवता, सत्कारासाठी कोणतीही वस्तु न आणता हा महोत्सव होणार आहे. महाराष्ट्रात असलेली दुष्काळ परिस्थिती लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला. या युवक महोत्सवात परिक्षकांना मानधन द्यावे लागते. त्यांनी आपले मानधन परत द्यावे अशी अपेक्षा कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांची आहे. या युवक महोत्सवात व्यवस्थपन परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.प्रविण पाटील, प्र.कुलगुरू डॉ.अशोक महाजन, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍड. प्रदिप नागापूरकर यांची उपस्थिती महत्वपुर्ण आहे. 19 ऑक्टोबर उद्घाटन दिनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन हे उपस्थित राहतील. या महोत्सवाचे निमंत्रण विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.डी.डी.पवार यांनी या महोत्सवात नांदेडकरांना विद्यार्थ्यांचे कलागुण पाहण्याची संधी मिळेल असे सांगितले. ज्ञानतिर्थ-2026 या युवक महोत्सवासाठी मुख्य व्यासपीठास साने गुरुजी यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच इतर चार व्यासपीठांना नाना पाटेकर, डॉ.श्रीराम लागू, पंकज उदास, स्मिता पाटील यांची नावे देण्यात आली आहेत. या महोत्सवात संगित, नृत्य, नाट्य, वाड्य, ललितकला, तसेच महाराष्ट्राच्या लोककलांशी संबंधीत एकूण 30 कलांमध्ये विद्यार्थी सहभागी होतील. शास्त्रीय गायन, वाद्य वादन, सुगम संगित, समुह गाण, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकांकीका, मुक अभियन, वाद-विवाद, वत्कृत्व, कथा-कथन, चित्रकला, कोलाज, पोस्टरमेकींग, रांगोळी, छायाचित्रन, मेहंदी, माती काम, पोवाडा, लावणी, लोकसंगित आणि प्रबोधनात्मक जलसा अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलांचे प्रतिभा दर्शन नांदेडकरांना मिळणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी युध्द नको बुध्द हवा, अंमली पदार्थांचे दुष्परीनाम आणि युवा पिढीसमोरील आव्हाने, हवामान बदल मानवी अस्तित्वासमोरील नवे आव्हान आणि कृत्रीम बुध्दीमत्ता, मानवी अस्तित्वावरील विळखा हे चार विषय आहेत. 16 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले ते सायन्स महाविद्यालय अशी मिरवणूक काढून या कार्यक्रमाची सुरूवात होईल. नांदेडच्या जनतेने या कार्यक्रमाचा आस्वाद घेवून युवक-युवतींना पाठबळ द्यावे असे आवाहन स्वारातीमचे जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 121 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जंतर-मंतरवरील बंदीला आंदोलकांचे गनिमी काव्याने उत्तर; पोलिसांना हुलकावणी देत फडकवला तिरंगा! तारीफ के भुखे को दिखाया आईना! थलापती विजय यांनी पंतप्रधान मोदींना मंचावरच सुनावले; निधीवरून थेट आव्हान!