नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेला दुसऱ्या महिलेेने घर बसल्या कमाई करण्याचे आमिष दाखवून 2 लाख 4 हजार 999 रुपयांची फसवणूक केली आहे.
बेलानगर भागात राहणाऱ्या अश्र्विनी संजय सुर्यवंशी(30) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 मे दुपारी 4 वाजता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाटसऍप संदेश आला. त्यात वय विचारले. तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन काम देण्यात येईल. त्या कामासाठी तुम्हाला एकही रुपया भरायचा नाही. तुम्हाला फक्त 20 स्टॉक पुर्ण करायचे आहेत. म्हणून अज्ञात मोबाईल क्रमंाक 8109081204 वरुन जान्हवी नावाच्या महिलेने अश्विनी सुर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. लिंक व अकाऊंट ओपन करायला लावून त्यातील स्टॉक पुर्ण करून देण्या करीता कमिशन देतो असे म्हणून ती प्रक्रिया पुर्ण करायला लावली. त्यात 2 लाख 4 हजार 999 रुपये ऑनलाईन काढून घेतले. तुमचे स्टॉक कंपलीट झाले नाहीत ते पुर्ण केले तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील असे सांगितले. भाग्यनगर पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 193/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक रमेश वाघ हे करणार आहेत.