नांदेड पोलीस व महसूल प्रशासनाचा अवैध वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राइक; १३ कोटी १२ लाखांचा ऐवज जप्त व उद्ध्वस्त!

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा पोलीस दल आणि महसूल विभागाने गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि व्यापक विशेष मोहीम राबवली आहे. नवरात्रीच्या प्रतिपदेलाच करण्यात आलेल्या या जोरदार प्रहाराने जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

गोदावरीच्या पात्रात बोटीतून फिरून थेट कारवाई

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी स्वतः इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गोदावरी नदीपात्रात बोटीतून फिरून पाहणी केली आणि विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असलेला वाळू उपसा पूर्णपणे नेस्तनाबूत केला. ज्या अवजड लोखंडी बोटी व इंजिने नदीपात्राबाहेर काढणे शक्य नव्हते, त्यांना महसूल पथकाच्या उपस्थितीत पंचांसमक्ष जिलेटिनच्या साहाय्याने जागीच स्फोट घडवून नष्ट करण्यात आले, तर वाळू उपशासाठी वापरले जाणारे तराफे डिझेल ओतवून जाळून खाक करण्यात आले.

कारवाईचा प्रमुख ताळेबंद आणि जप्त मुद्देमाल

या एकाच दिवसाच्या धडक मोहिमेत एकूण १३ कोटी १२ लाख १ हजार रुपयांचा प्रचंड मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे:

  • २७ मोठ्या बोटी व १३ लहान बोटी
  • १०८ तराफे
  • ५ अवजड इंजिने
  • १ पोकलेन मशीन
  • ४ हायवा ट्रक, १ टेम्पो आणि १ ट्रॅक्टर
  • ५५५ ब्रास जप्त रेती
  • एकूण जप्त व नष्ट मुद्देमालाचे मूल्य: ₹ १३,१२,०१,०००/- (१३ कोटी १२ लाख १ हजार रुपये)
  •  
  • मोहिमेचे नेतृत्व व सहभागी पोलीस अधिकारी
  •  राहुल कर्डिले – जिल्हाधिकारी, नांदेड
  •  डॉ. नीलाभ रोहन – पोलीस अधीक्षक, नांदेड
  •  सुरज गुरव – अपर पोलीस अधीक्षक, नांदेड
  • रामेश्वर व्यंजने – उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर उपविभाग)
  • शाम पानेगावकर – उपविभागीय पोलीस अधिकारी (बिलोली उपविभाग)
  •  प्रशांत शिंदे – उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा उपविभाग)
  • सुशील जुमडे – उपविभागीय पोलीस अधिकारी (कंधार उपविभाग)
  • किरण पोपळघट – उपविभागीय पोलीस अधिकारी (देगलूर उपविभाग)
  • वैभव पडवळ – पोलीस अधिकारी (देगलूर)
  • आशिष सिताराम बोराटे – जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड
  • इतर अधिकारी व अंमलदार: नांदेड ग्रामीण, मुदखेड, उस्माननगर, लिंबगाव, नायगाव, धर्माबाद व स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, ३० पोलीस अधिकारी, १२१ पोलीस अंमलदार, ७० होमगार्ड व आर.सी.पी. च्या २ तुकड्या.

वाळू माफियांसाठी जबर इशारा

शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या वाळू माफियांची कोणतीही गय केली जाणार नाही. नवरात्रीच्या प्रतिपदेला करण्यात आलेला हा प्रहार वाळू माफियांसाठी मोठा धडा आहे. अवैध व्यावसायिकांनी या घटनेतून वेळेच धडा घ्यावा, अन्यथा पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन मिळून यापेक्षाही तीव्र स्वरूपाची कारवाई यापुढेही अविरत सुरूच ठेवेल, असा थेट व कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

पोलीस ठाणे निहाय कारवाईचा ताळेबंद

क्र. पोलीस ठाणे कारवाईचे ठिकाण / स्वरूप जप्त / उद्ध्वस्त मुद्देमाल व वाहने एकूण किंमत (रु.)
१ मुदखेड गोदावरी नदीपात्र १३ मोठ्या बोटी, ०५ छोट्या बोटी व ७५ ब्रास रेती ५,११,७५,०००/-
२ उस्माननगर कौडगाव, कामळज, येळी नदीपात्र ०८ मोठ्या बोटी, ०६ छोट्या बोटी, ७५ ब्रास रेती व १ पोकलेन मशीन ३,९८,७५,०००/-
३ नांदेड ग्रामीण व LCB (नदीपात्र) मार्कंड, विष्णुपुरी, पिंपळगाव निमजी, वाहेगाव, कल्लाळ व भनगी शिवार ०५ मोठ्या बोटी, ०२ छोट्या बोटी, ४०५ ब्रास रेती व १०३ तराफे २,७७,०५,०००/-
४ नांदेड ग्रामीण (रस्ते वाहतूक) मुदखेड रोड व असजन गाव पूल २ हायवा ट्रक (१० ब्रास रेतीसह) व १ टाटा ४०७ टेम्पो (१ ब्रास रेतीसह) ६८,०५,०००/-
५ नायगाव नांदेड-नायगाव रस्ता व बापू बिअर शॉपीसमोर ३ विना नंबर भारत बेंझ हायवा ट्रक व ९ ब्रास रेती ४०,३६,०००/-
६ लिंबगाव मौजे बोरगाव तेलंग नदीपात्र ०१ मोठी लोखंडी बोट, ०५ इंजिने व ०५ तराफे (स्फोट घडवून व जाळून नष्ट) ३१,५०,०००/-
७ धर्माबाद नेहरू चौक, धर्माबाद १ स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली (१ ब्रास रेतीसह) २,५५,०००/-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!