अर्धापूर तालुक्यातील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर (प्रतिनिधी) – शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावून नुकसान केल्याची घटना अर्धापूर शिवारात ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी फिर्यादी काशिनाथ किशनराव बिरकर (वय ६७ वर्षे, रा. गवळी गल्ली, अर्धापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अर्धापूर शिवारातील फिर्यादी यांच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन हंगामात पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६३/२०२६, भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोणारकर करीत आहेत. शेतातील पिकाला आग नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून लावली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!