नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 01 ते 31 ऑक्टोबर, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका – जुगार, अवैध दारु विक्री, शस्त्र अधिनियम व इतर कलमांन्वये अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -4 राबविण्यात येत आहे. सदर मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 07 ऑक्टोबर, 2026 दरम्यान संपलेल्या पहिल्या आठवड्यात, नांदेड परिक्षेत्रात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (3), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (40), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (137), शस्त्र अधिनियमान्वये (6), तर इतर अधिनियमांखाली (36), अशा एकूण (222) कारवाया करुन (335) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 3,31,30,246/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिक्षेत्रातील विविध घटकांनी अवैध व्यवसाय निर्मुलन-4 मोहिमेमध्ये केलेल्या कारवाया पुढील प्रमाणे : जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या नांदेड 1 7080 2 11 8,39,410 48 48 2,76,755 48 4 33,700 4 11 1,10,57,410 16 परभणी 0 0 0 8 4,81,750 37 14 67,935 14 1 100 1 6 1,10,49,300 8 हिंगोली 1 4,34,996 1 8 9,290 8 33 1,21,370 34 0 0 0 11 61,76,410 12 लातूर 1 5,070 1 13 3,99,885 49 42 3,79,570 42 1 0 1 8 17,90,215 9 एकुण 3 4,47,146 4 40 17,30,335 142 137 8,45,630 138 6 33,800 6 36 3,00,73,335 45 सदर कारवाईत, पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे केलेली गुटखाविरोधी कारवाई, नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील जुगारविरोधी कारवाई, तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे केलेल्या मटका विरुद्ध कारवाईचा समावेश आहे. खबर हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 24 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation २१ गुंठे जमिनीच्या व्यवहारातून ३१.५० लाखांची फसवणूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा