भोकर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत भोकर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत ₹७,५८,२८८/- किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईचा सविस्तर तपशील: भोकर पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार, भोकर शहरातील ईनामदार गल्ली परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी ईनामदार गल्ली येथील सार्वजनिक रस्त्यावर पंचांसमक्ष छापा टाकला. तपासणीदरम्यान पोलिसांना एक संशयित स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH-26 N 4137, किंमत ₹६,००,०००/– मिळून आले. वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात विविध कंपन्यांचा पानमसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखू असा ₹१,५८,२८८/- किमतीचा प्रतिबंधित साठा आढळला, जो पोलिसांनी तात्काळ जप्त केला. आरोपी व दाखल गुन्हा: याप्रकरणी आरोपी मझरोद्दीन मोहमद अरोफोदीन, वय ३० वर्षे, राहणार ईनामदार गल्ली, भोकर याच्याविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. ५२९/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम २६ व २७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करणारे पोलीस पथक: ही धडक कामगिरी नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत भोकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे यांच्यासह पोलीस अंमलदार जगदीश, विठ्ठलराव पेंडेवाड, सिद्धेश्वर गुंडेवार, संजीव जिंकलवाड, साहेबराव हौसरे, विवेकानंद गिरी, सिद्धार्थ केळकर, राजेश घुळघुळे व राजेश, सर्व नेमणूक भोकर पोलीस ठाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Kanthak Suryatal Post Views: 120 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सेवा संकल्प अभियान अंतर्गत जेष्ठ नागरिक दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा