तीन जणांविरुद्ध कलम ४०८, ३४ भादंविनुसार कारवाई; पोलिसांकडून तपास सुरू तामसा (प्रतिनिधी) – भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीच्या एकूण ६ लाख ४२९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तामसा पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च २०२३ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत शाखा कार्यालय हदगाव येथून तामसा रोडवरील तामसा येथे कार्यरत असताना आरोपींनी संगनमत करून कंपनीच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात राजेश श्रीधर सवई (रा. उमरी), नागेश तुकाराम यलसटवाड (रा. सावळी, ता. बिलोली) आणि अभिजीत रमेश कवडे (रा. अर्धापूर) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत राजू शिवाजीराव धोंडगे (वय ४७, रा. सिडको, नांदेड) यांनी तामसा पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून तामसा पोलिस ठाणे गुन्हा क्रमांक २०५/२०२६ अन्वये भारतीय दंड विधानातील कलम ४०८ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीच्या रकमेच्या गैरव्यवहारामागील नेमकी पद्धत, आरोपींची भूमिका आणि रक्कम कुठे वळविण्यात आली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 17 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डायल ११२ वर खोटे कॉल करून पोलिसांना नाहक त्रास; मद्यधुंद इसमाविरुद्ध नायगाव पोलिसांत गुन्हा