नांदेड,(प्रतिनिधी)-अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या विशेष पथकाने काल रात्री देगलूर उदगीर रस्त्यावर विनापरवाना वाळूची वाहतूक अर्थात चोरी करणाऱ्या तीन हायवा गाड्या पकडल्या आहेत.त्यातील गाड्यांचे चालक गाड्या सोडून पळून गेले आहेत.
नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या पथकातील पोलीस आमदार विलास बारगे, शिवा मुखेडकर आणि आणि गुरुदीपसिंघ कालरा हे देगलूर पोलीस उपविभागात गस्त करत असताना त्यांनी देगलूर उदगीर रस्त्यावर हायवा गाडी क्रमांक एक 36 सी 3356 हिला थांबवलं त्याच्याकडे वाळू वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नव्हता, महसूल विभागा कडून दिले जाणारे कागदपत्र नव्हते. सोबतच त्याच्यामागे के.ए.56 7017 आणि विनाक्रमांकाची एक हायवा गाडी तपासण्यात आली. त्यातील विना क्रमांकाच्या हायवा गाडीतील लोक गाडी उभी करून पळून गेले आहेत. या तीनही हवागाड्यांमध्ये बेकायदेशीर रित्या, विनापरवानगी आणि कोणतेही कागदपत्र नसताना वाळू भरलेली होती या तिन्ही हायवा गाड्या पोलीस पथकाने देगलूर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केल्या असून पुढील कायदेशीर कार्यवाही देगलूर पोलीस करणार आहेत.गाड्यांवर लिहिलेले क्रमांक कन्नड भाषेत आहेत.प्राप्त झालेल्या आरटीओ नियमानुसार कोणत्याही गाडीवर इंग्रजी भाषेत नंबर लिहिणे आवश्यक असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अबिनाश कुमार यांच्या पथकाने आता अवैध्य वाळूवर कार्यवाही सुरू केली आहे. ही कार्यवाही एकदाच न थांबता कायम स्वरूपात चालत राहावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.