नांदेड (प्रतिनिधी) – शालेय क्रीडा जिल्हास्तरीय स्पर्धा २०२६-२७ मध्ये नांदेड क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत अपूर्वा प्रकाश रोकडे आणि अंकिता प्रकाश रोकडे या भगिनींनी यश संपादन करत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

अपूर्वा प्रकाश रोकडे हिने १९ वर्षांखालील (U-19) गटात लॉन टेनिस तसेच सॉफ्ट टेनिस या दोन्ही प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली. तर अंकिता प्रकाश रोकडे हिने १४ वर्षांखालील (U-14) गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीची दखल घेत दोघींची *विभागीय स्पर्धेसाठी निवड* झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना नांदेड क्लबचे प्रशिक्षक शरद सर कानडजे, महात्मा फुले हायस्कूल बाबानगरचे प्रशिक्षक संतोष स्वामी सर, सोनखेडकर येथील सय्यद सर तसेच कराटे नांदेडचे प्रशिक्षक चंद्रकांत आढाव सर यांचे मार्गदर्शन लाभले. रोकडे भगिनींच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, शिक्षक, पालक आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!