नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एका महिला पोलीस अंमलदाराला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शारीरिक शिक्षण या विषयात विद्यावाचस्पती(पीएचडी) पदवी बहाल केली आहे. सन 2023 मध्ये महिला पोलीस अंमलदार लोपामुद्रा आनेराव यांनी शोध प्रबंध सादर केला होता.
नांदेड जिल्हा पोलीस दलात अंदाजे सन 2005 मध्ये लोपामुद्रा दत्तराव आनेराव या पोलीस विभागात रुजू झाल्या. पोलीस विभागात विविध मैदानी खेळामध्ये त्यांनी आपले नाव गाजवले. 100 मिटर धावणे या स्पर्धेत देशाच्या पोलीस खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवल्यानंतर तत्कालीन पोलीस अधिक्षक तथा आजचे नागपूर पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी लोपामुद्रा आनेरावला एक अतिरिक्त पदोन्नती देण्याचा प्रस्ताव पाठविला होता आणि तो मंजुर झाला. लोपामुद्रा यांचा विवाह पोलीस दलातील सुशिल प्रकाश कुबडे यांच्यासोबत झाला. आज लोपामुद्रा आनेराव ह्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील महिला सहायक कक्ष विभागात कार्यरत आहेत. सुशिल कुबडे हे जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत.
नांदेड शहरातील सायन्स कॉलेज येथे क्रिडा विभाग प्रमुख असलेल्या डॉ.अश्र्विनी बोरीकर यांच्या मार्गदर्शनात लोपामुद्रा आनेराव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखे अंतर्गत शारिरीक शिक्षण विषयात विद्यावाचस्पती(पीएचडी) पदवीसाठी शोध प्रबंध सादर केला. लोपामुद्रा आनेराव यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधात अंतरमहाविद्यालयीन लघु अंतर धाावण्याच्या स्पर्धेतील सहभागी महिला खेळाडूंच्या व्यक्तीमत्व, आत्मविश्र्वास व निवास परिसर यांचा क्रिडा कार्यमानावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून हा शोध प्रबंध सादर केला होता. कारण लोपामुद्रा आनेराव यांनी सुध्दा आपल्या सुरूवातीच्या जीवनात अनेक लघुअंतर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना त्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये महिलांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास आपसुकच झाला होता आणि आपल्या जीवनातील अनुभवांना शोध प्रबंधाच्या माध्यमाने उत्कृष्ट मार्गदर्शक डॉ.अश्र्विन बोरीकर यांच्या मार्गदर्शनात लोपामुद्रा आनेराव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शोध प्रबंध सादर केला.
आपल्या शोध प्रबंधाच्या सहकाऱ्याचे धन्यवाद देतांना लोपामुद्रा आनेराव यांनी आपले पती सुशिल कुबडे यांचे धन्यवाद लिहितांना माझी छोटी बालके असतांना सुध्दा माझे पती सुशिल कुबडे यांनी शोध प्रबंधासाठी मला केलेली मदत मी कदापी विसरु शकणार नाही असे लिहिले. तसेच मुख्य प्रेरणास्थान म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल, नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांचा विशेष उल्लेख केला आहे. आपले गुरूवर्य महात्मा गांधी महाविद्यालय मुदखेडचे माजी प्राचार्य मालपाणी, चिकाळा ता.मुदखेड येथील कै.यादवरावजी हायस्कुलचे मुख्याध्यापक अशोक मोरे यांनी शालेय जीवनात सुध्दा दिलेल्या धड्यांना मी जीवनभर सांभाळले असे नमुद केले आहे. स्वत:ची आई गिरजाबाई आणि वडील दत्ताराव आनेराव यांनी दिलेल्या प्रोत्साहानाला सुध्दा महत्व दिले आहे. स्वत:च्या सासुबाई कुसूम कुबडे यांनी दिलेल्याा प्रेरणांना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही असे लिहिले आहे. आपले मार्गदर्शक डॉ.अश्र्विन बोरीकर यांच्या बहुमुल्य मार्गदर्शनासाठी मी अजन्म ऋणी राहिल असे लिहिले आहे. अधिष्ठाता अंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा स्वारातीम नांदेड येथील डॉ.सुनंदा रोडगे, संचालक प्रा.पिंकुकुमार सिंह, शारिरीक शिक्षण विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ.पी.एन. देशमुख, डॉ.कल्लीपवार, डॉ.वैजंता पाटील, डॉ.भास्कर माने, डॉ.मनोज रेड्डी, डॉ.विठ्ठलसिंह परिहार, डॉ.कैलास पाळणे, डॉ.राजेश्वर पाटील, डॉ.दिपक बच्चेवार, डॉ.बावीसकर, डॉ.सुनिता पाटील, डॉ.केंगले, डॉ.दिनगिने यांच्या सदैव ऋणात राहण्यास मला आवडेल असे शोध प्रबंधाच्या ऋणनिर्देशात नमुद केले आहे.
पोलीस दलात काम करतांना त्यातून वेळ काढून विद्यावाचस्पती मिळविण्यासाठी लोपामुद्रा आनेराव यांनी घेतलेली मेहनत नक्कीच प्रशंसनिय आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर,पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, गृह पोलीस उप अधीक्षक डॉ.अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार,उदय खंडेराय, चंद्रशेखर कदम यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदारांनी लोपामुद्रा आनेराव यांचे अभिनंदन केले आहे.वास्तव न्यूज लाईव्हच्यावतीने सुद्धा लोपामुद्रा आनेराव यांचे अभिनंदन.