लातूर(प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हयात पोलीस पथक पाठविले होते. या पथकाने, दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस ठाणे अहमदपुर हद्दीतील मौजे उगिलेवाडी येथील घरामध्ये छापा टाकून त्या ठिकाणाहून 1 लाख16 हजार 880 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी सुधीर सुर्यकांत बेंबडे व अतुल सुर्यकांत बेंबडे रा. उगिलेवाडी, ता. अहमदपुर, जि. लातूर यांच्याविरुद्ध अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 614/2026 कलम 123, 223, 274, 275, 3(5) भारतीय न्याय संहितान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोलिस अमलदार प्रदिप खानसोळे, गणेश राठोड व गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे. खबर हेल्पलाइन वरुन माहिती द्या अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 25 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वाजेगावात तिर्रट जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांची धाड; १० आरोपींवर गुन्हा, ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त सायबर फसवणुकीपासून सुरक्षेसाठी स्वतःची जागरूकता हीच मुख्य ढाल – डॉ. नीलाभ रोहन