नांदेड (प्रतिनिधी) -जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात नांदेड पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असताना नांदेड ग्रामीण पोलिसांनी वाजेगाव येथील विटभट्टीजवळील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या अवैध ‘तिर्रट’ जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ₹३ लाख २५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वाजेगाव येथील मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीररीत्या ‘तिर्रट’ जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत शेख रमजान शेख हेदर रा. वाजेगाव, सय्यद जावेद रा. वाजेगाव, सय्यद हुसेन रा. वाजेगाव, शेख रफिक शेख शफी रा. वाजेगाव, शेख गाजीत शेख महेबूब रा. वाजेगाव, शेख खयुम शेख उमरसाच, सय्यद युसूफ रा. धनेगाव, सय्यद अब्दुल रहीम हाजी अमीनसाब रा. आदनान गार्डन यांच्यासह अन्य आरोपींवर कारवाई करण्यात आली. शेख इस्माईल पायामिया हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत ३ मोटारसायकली, रोख ₹२,६६० रुपये, ५ मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. मोटारसायकलींची अंदाजे किंमत ₹२ लाख ७० हजार, तर मोबाईलची किंमत ₹५२ हजार ९०० असल्याचे नमूद आहे. अशा प्रकारे एकूण ₹३,२५,५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११९७/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक चिचोलकर यांच्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांचे पथक कारवाईत सहभागी झाले. पथकात पोलीस अंमलदार भिसे, पवार, तेलंग, कल्याणकर आणि टिपरसे यांचा समावेश असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 125 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किल्ल्याला तडे: उत्तर प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलह, स्वाभिमानची भाषा आणि २०२७ ची चिंता