अर्धापूर (प्रतिनिधी) – दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:५५ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ (NH 361) वरील सम्राट चौक, अर्धापूर येथे रस्ता अपघात घडला. यामध्ये मोटारसायकल (क्रमांक MH 26 BG 0871) चालक रस्ता ओलांडत असताना ट्रकने (क्रमांक GJ 05 BZ 3374) धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार ओमकार प्रल्हाद साखरे (वय १९, रा. खैरगाव, ता. अर्धापूर) हा गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळी पोलीस भेट व मदतकार्य:
अपघाताची माहिती १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता मिळताच महामार्ग पोलीस केंद्र नांदेड आणि पोलीस ठाणे अर्धापूरच्या पोलीस पथकाने दुपारी १२:०५ वाजता घटनास्थळी भेट दिली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुट्टे,अनेक पोलीस अंमलदार तसेच  सेवक वसंत शृंगारे यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ मदतकार्य राबवले.

उपचार व सद्यस्थिती:
अपघातग्रस्त जखमी तरुण ओमकार साखरे यास केटीएल टोल नाका येथील ॲम्बुलन्सद्वारे प्रथम सरकारी दवाखाना अर्धापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यास यशोसाई हॉस्पिटल, नांदेड येथे दाखल करण्यात आले असून सध्या तेथे उपचार सुरू आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!