नांदेड,(प्रतिनिधी)-श्रीकृष्ण मंदिर विश्वस्त मंडळ आणि काबरानगर सांस्कृतिक मंचच्या वतीने काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील व्याख्यान दि. २८ ते ३० एप्रिल दरम्यान होणार आहे. यावेळी किशोरवयीन युवक, तरूण, विद्यार्थी आणि पालक यांना उद्बोधन करणारे व्याख्यानाचे विषय असतील. याकरिता काबरानगर सांस्कृतिक मंच विविध क्षेत्रातील तज्ञांना व्याख्यानासाठी आमंत्रित करणार आहे. डिसेंबर २३ पासून श्रीकृष्ण मंदिर विश्वस्त विविध व्याख्यानमाले द्वारा समाज प्रबोधनाचे मोलाचे कार्य करत आहे. या व्याख्यानमालेला उत्तम प्रतिसादही मिळत आहे.
२८ तारखेला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रा.डॉ. घनश्याम येळणे व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक २९ रोजी तारुण्याच्या उंबरठ्यावर या विषयावर विद्यापीठातील प्रा.डॉ. अनुराधा पत्की, या मार्गदर्शन करतील आणि ३० तारखेला सामाजिक कार्यकर्ती प्रा. अॅड. दीपा बियाणी या पाल्य व पालकः समस्या व उपाय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दररोज संध्याकाळी ठीक सात वाजता श्रीकृष्णाच्या आरतीनंतर व्याख्यानाला सुरूवात होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या तीन दिवसीय व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.