नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या शेख शमीम हत्या व मकोका (MCOCA) प्रकरणातील फरार आरोपी कलंदर बेग गफ्फार बेग (वय ४८, रा. खडकपुरा, नांदेड) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, विशेष मकोका विशेष न्यायाधीश तुषार आगलावे यांनी त्यास १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणाची पार्श्वभूमी व कारवाई: वजीराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ४९, ६१(२), ३(५), शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) १९९९ चे कलम ३(१)(i), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपी कलंदर बेग हा फरार होता. ९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २०:५२ वाजता अटक केली. न्यायालयातील युक्तिवाद व तपास: प्रकरणाचे तपासी अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर) रामेश्वर व्येंजने यांनी आरोपीला विशेष मकोका न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा सखोल तपास, टोळीतील इतर सदस्यांचा शोध व चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. यादव तळेगावकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडत आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व तपासाची गरज लक्षात घेऊन मकोका न्यायाधीश तुषार आगलावे यांनी आरोपी कलंदर बेग यास १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात यापूर्वी मिर्झा शब्बीर बेग यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आलेली असून, प्रकरणाचा पुढील सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्येंजने करत आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार बेग (वय ३४/३६ वर्षे, रा. सैलानीनगर / खडकपुरा, नांदेड) मुस्ताक अहमद ईसाख अहमद (वय २१ वर्षे, रा. चैतन्यनगर, आसरानगर, तरोडा बु., नांदेड) सय्यद सुफीयान सय्यद जमिल (वय १९ वर्षे, रा. हबीबीया मस्जिद जवळ, देगलुर नाका, इतवारा, नांदेड) माधव भगवान कांबळे (वय २१ वर्षे, रा. राहुल कॉलनी, तरोडा बु., नांदेड) ऋषिकेश अनिल घुले (वय २३ वर्षे, रा. बोधिसत्वनगर, मालेगाव रोड, भावसार चौक, तरोडा बु., नांदेड) अब्दुल तौकीर अब्दुल सगीर (वय २४ वर्षे, रा. दुलेशाह रहमाननगर, गल्ली नं. २, खडकपुरा, नांदेड) शेख सादिक शेख चाँदपाशा (वय २६ वर्षे, रा. हामिदीया कॉलनी, इदगाह रोड, देगलुर नाका, नांदेड) शेख नझीर शेख रशीद (वय २७ वर्षे, रा. हामिदीया कॉलनी, मलंगबाबा, इतवारा, नांदेड) सय्यद सलीम सय्यद खासीम (वय ३० वर्षे, रा. युसुफीया आरबी मदरसा जवळ, दुलेशाह रहमाननगर, नांदेड) जुबेर खान अकबर खान (वय २१ वर्षे, रा. दुलेशाह रहमाननगर, गल्ली नं. २, नांदेड) सिराज खान अनवर खान पठाण (वय २६ वर्षे, रा. दुलेशाह रहमान नगर, वाघी रोड, नांदेड) शेख गौस उर्फ शारुख पि. शेख फारुख (वय २३ वर्षे, रा. आंबेडकर नगर / मिल्लतनगर, देगलुर नाका, नांदेड) आरोपींना अटक करण्यात आलेली असून, प्रकरणाचा पुढील सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्येंजने करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 22 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इळेगावात वाळू माफियांची दहशत! पोलिसांच्या पथकावर जीवघेणी दगडफेक;एसडीपीओंसह चार पोलीस कर्मचारी जखमी; ताब्यातील संशयितही पसार सागर बारसमोर मध्यरात्री रंगला २ ब्रास रेतीचा नाट्यप्रयोग: जरा फोनवर बोला ना म्हणणाऱ्या मध्यस्थासह ५ जणांवर कायद्याचा दणका!