नांदेड(प्रतिनिधी)-येत्या 48 तासात रेडीओवरून मतदान संपेपर्यंत निवडणुक विषयक बाबींचे प्रसारण करण्यास 16-नांदेड लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी बंदी घातली आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केलेल्या पत्रानुसार ऑल इंडिया रेडीओ(आकाशवाणी) चे केंद्र प्रमुख, रेड एफएमनांदेडचे विभागीय व्यवस्थापक, रेडीओ सिटी नांदेडचे विभागीय व्यवस्थापक आणि माय एफ एम नांदेडचे विभागीय व्यवस्थापक यांच्या नावे जारी केलेल्या पत्रानुसार मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यंत रेडीओवरुन निवडणुक विषयक बाबींचे प्रसारण करण्यास बंदी घातली आहे. भारत निवडणुक निर्णय आयोगाचे निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकरीता हस्तपुस्तिकेमध्ये कलम ब आणि उपकलम 1 नुसार मला असे अधिकार प्राप्त आहेत. म्हणून रेडीओवरुन निवडणुक विषयक कोणतेही प्रसारण करू नये असे या आदेशात नमुद केले आहे.