नांदेड,(जिमाका)- 16-लोकसभा नांदेड निवडणुकीतील पात्र 23 उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी 24 एप्रिलला होत आहे. या बैठकीला उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीने उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या यापूर्वी १२ एप्रिल व १८ एप्रिलला दोन खर्च तपासण्या झाल्या आहेत. 24 एप्रिलला सकाळी 11 ते सायं 6 वाजेपर्यंत कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन कॅबिनेट बैठक कक्ष तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे ही अंतिम तपासणी आहे. या तपासणीसाठी दोन्ही खर्च निवडणूक निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड, मग्पेन भुतीया उपस्थित राहणार आहेत.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर स्वतः किंवा प्रतिनिधीद्वारे सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळावेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करणाऱ्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ( अपात्र ) ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय