पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पहिली कारवाई – विशाल सिद्धार्थ गायकवाड :
भाग्यनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 445/2026, कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विशाल सिद्धार्थ गायकवाड, वय 22 वर्षे, रा. बेला नगर, नांदेड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 42 सें.मी. लांबीचा लोखंडी धारदार खंजीर जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई – अक्षय केशव पांढरे :
भाग्यनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 446/2026, कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय केशव पांढरे, वय 25 वर्षे, रा. शंकर नगर, तरोडा (खु.), नांदेड याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे 33 सें.मी. लांबीचा धारदार लोखंडी खंजीर जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ₹500 असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
तिसरी कारवाई – श्रीराम रमेशराव मेटकर :
अर्धापूर पोलीस ठाणे गु.र.नं. 462/2026 अंतर्गत कारवाई करण्यात आली. श्रीराम रमेशराव मेटकर, वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. श्रीरामनगर, अर्धापूर, जि. नांदेड याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विनापरवाना बनावट पिस्तूल आढळून आले असून ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथी कारवाई – शुभम भगवान काळे :
नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. 987/2026 अंतर्गत कारवाई करण्यात आली. शुभम भगवान काळे, वय 23 वर्षे, व्यवसाय बेकार, रा. गुरुवार बाजार, नांदेड याला गोविंद कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे 16 इंच लांबीचा लोखंडी धारदार खंजीर जप्त करण्यात आला. जप्त खंजीराची अंदाजे किंमत ₹400 असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित भाग्यनगर, अर्धापूर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची विक्री अथवा वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईत संबंधित पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग घेतला.
