नांदेड:- एमएच-सीईटी परीक्षा-2024 ही 22 एप्रिल ते 17 मे 2024 (25,26 एप्रिल व 5,6,7,8,12,13,14 मे 2024 हे दिवस वगळून) या कालावधीत जिल्ह्यात 8 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. दर्शविलेल्या या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंध आदेश निर्गमीत केले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 974 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवडणूक कर्मचा-यांसाठी 108 बसेसची व्यवस्था निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तरंग सेवाभावी संस्थेचे मतदाता जागरूकता अभियान