पुणे (प्रतिनिधी) – निसर्ग संवर्धनासोबतच मानवसेवेसाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शांतीदूत परिवाराच्या कार्याचा सुजय प्रतिष्ठानतर्फे गौरव करण्यात आला. समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शांतीदूत परिवारातील पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सेवा रत्न व समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून निसर्ग व मानवसेवेअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गरजू व्यक्तींना मदत, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम तसेच पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या कार्याची दखल घेत सुजय प्रतिष्ठानने या कार्याचा सन्मान केला.यावेळी शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव यांना विशेष गौरविण्यात आले. तसेच परिवाराचे मार्गदर्शक डॉ. विठ्ठल जाधव, IPS, विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य (सेवानिवृत्त) यांच्यासह विजय ठूबे, डॉ. सुरेश राठोड, उमाकांत बिराजदार आणि मधुकर चौधरी यांना सेवा रत्न व समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मेघराज भोसले, अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ, शिवकुमार साळुंखे, अपर आयुक्त, कस्टम्स विभाग, भारत सरकार, सुप्रसिद्ध उद्योगपती रामदास माने, किशनराव भोसले, निलेश निकम तसेच पुणे महापालिका सभागृह नेते आणि सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या गौरव सोहळ्यामुळे शांतीदूत परिवाराच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली. समाजसेवा, मानवता आणि निसर्ग संवर्धनाची सांगड घालत समाजासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा झालेला हा सन्मान प्रेरणादायी ठरला. Kanthak Suryatal Post Views: 485 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शासकीय वसतिगृह योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन लातूरात मटका व जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाडी; 27 आरोपींविरुद्ध कारवाई, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त