नांदेड(प्रतिनिधी)-चैत्र शुध्द आष्टमी निमित्त निघालेल्या प्रभु श्री रामचंद्रजी यांच्या मिरवणुकीचे काम पुर्ण करून आज आपले काम करायचे आहे. या चिंतेत योगेश्र्वराने मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणूकीत अनेक आयडीया लढविल्या आणि त्यानुसार योगेश्र्वरांच्या अपेक्षेप्रमाणे मिरवणुक मागील वर्षापेक्षा कमी वेळात समाप्त झाली. या मिरवणूकीदरम्यान योगेश्र्वर आयटीआय चौकाजवळ आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसह उभे होते. त्यांना ही राम नवमीची मिरवणूक लवकरात लवकर पुढे पाठवावी याचे नियोजन करायचे होते. त्यानुसार ते काम करत होते. पण एक 10 ते 12 वर्षाचा बालक रामचंद्रजींच्या मिरवणूकीकडे सुसाट पळतांना योगेश्र्वराने पाहिले. योगेश्र्वर स्वत: त्या मुलाकडे पळाले आणि त्याला आपल्या कड्यात घेतले. विचारणा केली असता त्याला प्रभु श्री रामचंद्रजींचे दर्शन करायचे होते. तेंव्हा योगेश्र्वरांनी त्या बालकाच्या दृष्टीपथात श्री रामचंद्रजी आणले हे केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळेपुर्वी दिसणारी चिंता पुर्णपणे समाप्त झाली होती. त्या बालकाला जवळ घेवून अत्यंत हसतमुखाने योगेश्र्वरांनी छायाचित्रकारांना पोज दिली.
जो माणुस इतरांसाठी जास्त वेळे जगतो. तो नेहमीच तणावात असतो. काल चैत्र शुध्द नवमीच्या दिवशी नांदेड जिल्हा पोलीस दलाची अवस्था अशीच काहीशी होती. शहरातील विविध मंदिरांमध्ये श्री रामचंद्रजींची पुजा, आर्चा, महाप्रसाद असे आयोजन होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलीस लक्ष ठेवून होते. शहरातील काही मंदिरांमधून श्री रामचंद्रजींची मिरवणूक निघाली. काही-काही जागी ही मिरवणूक कमी अंतरात प्रवास करून पुन्हा मंदिरात जाते. परंतू मागील 13 वर्षापासून रेणुका माता मंदिरासमोरून निघणारी प्रभु श्री.रामचंद्रजींच्या जन्मोत्सवाची मिरवणूक ही अशोकनगर पर्यंत जाते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी संवेदनशिल जागा आहेत. मागील वर्षी सन 2023 मध्ये योगेश्र्वराने शिवाजीनगर भागातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया ते फुलेमार्केटपर्यंत रामभक्तांसोबत स्वत: नृत्य करत ही मिरवणूक पुढे नेली होती. असे करावे लागते पोलीसांना. काही शहाणे पत्रकार पोलीसांचे हे काम आहे काय? असे पोलीस अधिक्षकांना विचारतात. पत्रकारीता करून, राजकारण्यांनी विशेष जागेवर लाथ मारल्यानंतर पुन्हा पत्रकार झालेल्यांचा हा प्रश्न आहे.
श्री रामचंद्रजींची मिरवणूक आयटीआय चौकाजवळ आली होती. तेथेच पोलीस अधिक्षक आपल्या काही क्युआरटीच्या जवानांसोबत उभे होते. पहिल्या छायाचित्रात त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव दिसतात. तेवढ्यातच एक अचानक घटना घडली. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे उभे आहेत. त्यांच्या डाव्याबाजूने सुसाट वेगात पळत येणारा 10-12 वर्षाचा बालक त्यांनी पाहिला.त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्न फिरले असतील. त्याच्यावर सर्वोकृष्ट उपाय त्यांनी केला. ते स्वत: चार पाऊल पळत पुढे गेले आणि आपल्या दोन्ही हातांनी त्या बालकाला आपल्या कडेत घेतले. साहेब पळाला तेंव्हा पोलीसही पळाले. त्या सर्वांना त्या बालकाला घेरून योगेश्र्वरांनी विचारणा केली. काय पाहिजे तुला? बाळा तु का पळतो आहेस. बालक म्हणाला मी प्रभु श्री.रामचंद्रजींची मुर्ती पाहिली नाही आणि ती मला पाहायची आहे म्हणून मी पळालो. काही क्षणांपुर्वी योगेश्र्वरांच्या चेहऱ्यावर असलेले गांभीर्यतेचे चिन्ह एका क्षणात हसण्यात बदलले कारण योगेश्र्वरांच्या दृष्टीकोणातून बालकाची मागणी पुर्ण करणे त्यांच्यासाठी एकदम शुन्यतेच्या कमीचे काम होते. तेथूनच योगेश्र्वरांनी त्या बालकाला प्रभु श्री रामचंद्रांची मुर्ती दाखवली. तेंव्हा त्यांच्या मनात नक्कीच हे भाव आले असतील. प्रार्थना करण्यापेक्षा एखाद्या लहान बालकाला हसवणे ही प्रार्थनेपेक्षा मोठी प्रार्थना आहे. सोबतच इंग्रजी शब्दांमध्ये एक वाक्य आहे. वर्क इज वर्कशीप अर्थात तुमचे कामच तुमची प्रार्थना आहे. प्रभु श्री.रामचंद्रजींची मिरवणूक सुखरुप समाप्त करणे हे योगेश्र्वरांचे काम आहे. त्या कामातच त्यांनी त्या बालकाचे दर्शन घडविले. आपले काम पुर्ण करतांना योगेश्र्वरांनी केलेली ही प्रार्थना कुठे तरी नक्कीच मोजली जाईल.
त्यानंतर बालकाजवळ घेवून योगेश्र्वरांनी श्री.रामचंद्रजींचे दर्शन त्या बालकाला घडवून दिल्याचा आनंद व्यक्त करतांना छायाचित्रकारांना अत्यंत हसतमुखयाने छायाचित्र घेण्याची संधी दिली.
मागील वर्षी रामजन्मोत्सवाची मिरवणूक रात्री 11 वाजता संपली होती. यंदाच्या वर्षी मात्र योगेश्र्वरांनी ही मिरवणूक लवकरात लवकर समाप्त करून घेतली. पोलीसांनी काय काम करावे लागते. हे ज्यांना जाणून घ्यायचे आहे. त्यांनी योगेश्र्वरांनी वेळ कसा कमी केला आणि आजच्या कामासाठी, उद्याच्या कामासाठी, 26 एप्रिलच्या कामासाठी काल वाचविलेले मिरवणूकीचा वेळ ते कसे कामी आणतील. ही पत्रकारीता करावी. यालाच म्हणतात शोध पत्रकारीता.