नांदेड – मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा व्यक्तींनी आपल्या आवश्यक त्या माहितीसह प्रस्ताव विहित कालावधीत सादर करावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव ग्रामीण कवी नागोराव डोंगरे आणि राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती प्रमुख तथा येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी आज येथे घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, कैलास धुतराज, शंकर गच्चे, बाबुराव पाईकराव, रणजित गोणारकर यांच्यासह प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती. प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, साहित्य आदी क्षेत्रांतील महिला व पुरुष यांना पुरस्कार दिले जातात. आजपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रतिष्ठेचे मानले जात असून यावर्षी मराठी साहित्यातील आठ साहित्यिकांची निवड केली जाणार आहे. सन २०२५-२६ या वर्षाकरिता इच्छुकांनी आपल्या नाव, फोटो, पत्ता, प्रकाशित पुस्तकांच्या तीन प्रतींसह आवश्यक माहितीचा बायोडाटा असलेला प्रस्ताव नागोराव डोंगरे, आशिर्वाद निवास, यशवंत काॅलनी, उमरी ता. उमरी जि. नांदेड -४३१८०७ या पत्यावर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवावेत. साहित्यिकांनी आपली २०२५-२६ या वर्षातील प्रकाशित साहित्यकृती तीन प्रतींत पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९४२१७६९८४१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे Kanthak Suryatal Post Views: 315 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वार्षिक कार्यमूल्यमापन अहवालावर स्वाक्षरीसाठी ३००० रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात नांदेडकरांसाठी महानगरपालिकेची टोकदार भेट; गतिरोधक गेले, आता उरलेत फक्त मृत्यूचे खिळे !