नांदेड (प्रतिनिधी) – प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून गाडी क्रमांक 17633/17634 हुजूर साहिब नांदेड- तिरुचानुर–हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच या गाडीच्या रेक लिंकमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत ही गाडी 18 डब्यांसह धावत असून नव्या व्यवस्थेनुसार ती 22 डब्यांसह चालविण्यात येणार आहे. या वाढीमध्ये 01 वातानुकूलित चेअर कार, 02 वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि 01 शयनयान डब्यांचा समावेश करण्यात आला आहे.
ही सुधारित रचना हुजूर साहिब नांदेड येथून 1 ऑगस्ट 2026 पासून तर तिरुचानुर येथून 2 ऑगस्ट 2026 पासून लागू करण्यात येईल.
डबेवाढीमुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आसन व शयनयान उपलब्धता मिळणार असून प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल. विशेषतः उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने पायाभूत सुविधा व गाड्यांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असून ही डबेवाढ त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.