नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथे गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. २८ जुलै रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन एका महिलेने आपबिती कथन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरात गुप्तधन असल्याच्या संशयावरून एका तथाकथित बाबाला बोलावून पूजा अर्चा केली होती. त्यानंतर, हे धन प्राप्त करण्यासाठी घरातील दोन लहान मुलांचा बळी देण्याची मागणी करण्यात आली. पीडितेने या मागणीला विरोध करताच सासू गौसिया बेगम, दीर ऐजाज मेहबूब शेख, नणंद शबाना शेख आणि इतर नातेवाईकांनी तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवा काळे आणि पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील साळुंखे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अंधश्रद्धेचा कहर! नांदेडमध्ये आईच्या जागरूकतेमुळे टळला अनर्थ नांदेडच्या वाजेगावमध्ये गुप्तधनासाठी ३ आणि ५ वर्षांच्या मुलांचा नरबळी देण्याचा प्रयत्न पीडित महिलेच्या धाडसामुळे फसला आहे. सासरच्या मंडळींनी एका बाबाच्या सांगण्यावरून आपल्याच नातवांचा बळी देण्याचा अघोरी हट्ट धरला होता. मात्र, आईने विरोध करताच तिला मारहाण करून घराबाहेर काढले गेले. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, समाजात पसरलेल्या या अघोरी प्रथांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. महत्वाची माहिती: पीडित महिला: इरफाना बेगम शेख सलीम (वय २६) आरोपी: सासू गोसिया बेगम, एजाज मेहबूब शेख, बाबा अब्दुल सतार अब्दुल हमीद, शबाना शेख खुबेर, मेहबूब शेख आणि इतर. कायदेशीर कलमे: भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) आणि जादूटोणा विरोधी कायदा कलम ३(२), ३(३) दोन स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रेखा काळे आणि पोलीस उप निरीक्षक स्वप्नील साळुंखे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 796 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धक्कादायक! रशियात असलेल्या तरुणावर बिहारमध्ये गुन्हा? दिल्ली पोलिसांकडून सोशल मीडिया अकाऊंट्सची कुंडली तपासणी नातेसंबंधांना काळिमा! उच्चशिक्षित इंजिनिअर मुलाने संपत्तीसाठी संपवले जन्मदात्रीचे आयुष्य; न्यायालयाने सुनावली जन्मठेप