नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्ष येथे आज गुरुवार, दि.२३ जुलै, २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाड, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, शिवलिंग पाटील, केशव गवाळे, धर्मपुरी कोंका, संतोष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Kanthak Suryatal Post Views: 424 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कर्दनकाळ शहाजी उमाप यांचे 730 दिवस सूर्यस्तासोबत पूर्ण होणार नांदेडमध्ये भारत बंदला मोठा प्रतिसाद; बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेनंतर शहरात भव्य मोर्चा