नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सायबर फसवणूक, बनावट ओळखपत्राचा वापर करून प्रवास आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करून बियाण्यांची विक्री अशा तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकरणात एका नागरिकाला तब्बल 19 लाख 41 हजार 728 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सायबर सेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका आरोपीसह इतर साथीदारांनी आर्थिक फायद्याच्या आमिषाने नागरिकांना जाळ्यात ओढले. त्यांच्या नावावर बँक खाते उघडून, सिमकार्डचा वापर करून तसेच गेमिंग, शेअर मार्केट आणि इतर ऑनलाईन माध्यमांतून व्यवहार करत तब्बल 19.41 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर सेल पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक वसंत सप्रे पुढील तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, माळाकोळी येथे अहमदपूर–माळाकोळी बसप्रवासादरम्यान एका प्रवाशाने बनावट ओळखपत्राचा वापर करून प्रवास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बस डेपो प्रशासनाच्या तक्रारीवरून माळाकोळी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर भोकर तालुक्यातील बटाळ शेतशिवारात एका कंपनीने बियाण्यांची उगवण क्षमता 100 टक्के असल्याचा दावा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीवरून संबंधित कंपनीविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम व बियाणे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या तिन्ही प्रकरणांमुळे नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता सावध राहण्याचे आवाहन पोलिस व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 552 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सांगारेड्डीजवळ भीषण अपघात; नांदेडच्या एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या त्या कृतीने देश पेटला? मोदी सरकार अडचणीत, संजय राऊतांचे खळबळजनक ट्विट!