पत्रकारांच्या दुचाकीला धडक देवून पसार झालेल्या कार चालकावर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांच्या दुचाकीला जाणिवपूर्वक धडक देवून पसार झालेल्या अज्ञात कार चालकाविरुध्द कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहरातील पत्रकार प्रविणकुमार देशमुख व पत्रकार यशपाल भोसले दि.२८ जून रोजी वार्तांकन करण्यासाठी कंधार येथे त्यांची मोटारसायकल क्र.एमएच-२६-बीपी-३९६५ वरुन जात असताना लालवाडी जवळ एका पांढर्‍या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात अनपेक्षितपणे नव्हे तर जाणिवपूर्वक कार चालकाने धडक दिल्याचे प्रविणकुमार देशमुख यांनी फिर्यादीत नमुद केले आहे. दरम्यान या अपघातात दुचाकीवरील पत्रकार प्रविणकुमार देशमुख व यशपाल भोसले हे दोघेही जखमी झाले. गावकर्‍यांनी त्यांना मदत करत कंधार येथील प्राथमिक रुग्णालयात पाठवून दिले. या अपघातात प्रविणकुमार देशमुख यांच्या दुचाकीचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून, या प्रकरणी प्रविणकुमार देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!