नांदेड(प्रतिनिधि)-परमपूज्य स्वामी श्री प्रिया शरण जी महाराज यांच्या रसाळ अमृतवाणीतून नांदेडकरांना 5 ते 14 एप्रिल दरम्यान श्रीराम कथा रस रहस्यची मेजवानी मिळणार आहे. या कथेची तयारी पूर्ण झाली आहे. श्रीराम कथेसाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरात राज्यातील अनेक भाविकांचे नांदेडला आगमन झाले आहे. मालेगाव रोड येथील भक्ती लॉन्स येथे दररोज दुपारी साडेतीन ते साडेसात या वेळेत श्रीराम कथा होणार आहे.
5 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता अशोकनगर येथील राम मंदिरापासून भक्ती लॉन्स येथील कथास्थळपर्यंत भव्य कलशयात्रा काढण्यात येणार आहे. या कलश यात्रेत 1008 श्रीराम कलश घेऊन महिला भाविक सहभागी होणार आहेत. तसेच कथास्थळी श्री 1008 हनुमान चालीसा पठण दररोज कथा सुरू होण्यापूर्वी होणार आहे. नांदेडमध्ये यापूर्वी असा भव्य दिव्य सोहळा झाला नव्हता. या याबरोबरच परमपूज्य स्वामी श्री प्रिया शरणजी महाराज यांच्यावतीने विलक्षण दिव्य प्रवचन तसेच संकीर्तन दररोज सकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत भक्ती लॉन्स येथे कथास्थळी पार पडणार आहे. कथा समाप्तीच्या दिवशी म्हणजेच 14 एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत एक दिवसीय विशेष साधना शिबिर तसेच पुष्पांजली व पुष्पहोळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 1008 श्रीराम कलश यात्रा तसेच श्री हनुमान चालीसा पाठ हा कार्यक्रम एकत्रितरित्या नांदेडमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आहे. यासाठी हजारो भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विशेष म्हणजे परमपूज्य स्वामी श्री प्रिया शरणजी महाराज यांची नांदेड मध्ये बारा वर्षानंतर कथा होत आहे. या कथेला संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील तसेच तेलंगणा, आंध्रप्रदेश उत्तर प्रदेश, कर्नाटक व हरियाणा या राज्यातील भाविकांची ही उपस्थिती राहणार आहे. कथा यशस्वी करण्यासाठी राधा गोविंद सेवा समिती नांदेडचे अनंत रेणापूरकर, शरयू रेणापूरकर, बलभीम रेनापुरकर, सौ. दीपश्री रेणापूरकर, भरत रेनापुरकर, सौ. अरुणा रेणापूरकर यांच्यासह मुख्य यजमान सुधाकर टाक धानोरकर, सौ. प्रभावती टाक, शिवप्रसाद टाक, सविता टाक, कैलाश टाक, सौ. वैशाली टाक, रुपेश टाक, सौ. कीर्ती टाक, कीर्तीश्वर टाक, सौ. रोहिणी टाक यांच्यासह मुख्य संयोजक सतपाल राजम व राजम परिवार , राजीव सदाशिवराव जोशी, दुर्गाचारी किस्तैय्या चैनाजोलु, निखिल लातूरकर व मनोज देशपांडे आदी भाविक परिश्रम घेत आहेत. जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.