नांदेड(प्रतिनिधी)-देशात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जातनिहाय समिकरणे लावून सुरू आहे. लोकसभा निवडणुक ही पत्रकारांसाठी “अच्छे दिन’ आहेत. नांदेडच्या पत्रकारांमध्ये सुध्दा असाच जातीविषयक संघटन करून पत्रकारीतेतील लेखणीची शाई एम फॅक्टरप्रमाणे चालविण्याचा प्रकार सुध्दा एका पत्रकाराच्या चिंंधीगिरीमुळे सुरू आहे.
भारतीय लोकशाहीमध्ये लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ प्रसार माध्यमांना मानले जाते. त्यामुळे समाजात सुध्दा पत्रकारांना एक वेगळे स्थान तयार झाले आहे. समाजात कोणाचीही बाजू जी बाजू कोणीच मांडली नाही. ती मांडून पत्रकार आपल्यातील दम दाखवू शकतात. समाजातील दुर्लक्षीत, वंचित घटकांच्या हक्कांसाठी पत्रकारांनी बाजू मांडली पाहिजे. असा एक समज समाजात आहे. खरे तर असे करणे म्हणजे पत्रकारांची ती ड्युटीच आहे. इंग्लंडमधील पत्रकार ऍर्नाल्ड म्हणतात सत्ताधिशांच्या विरोधात बातम्या छापणे हीच खरी पत्रकारीता आहे. इतर फक्त नाती सांभाळणे आहे. पण ऍर्नाल्डच्या या वाक्यावर चालते कोण? नांदेडच्या पत्रकारीतेत एका पत्रकाराने एम फॅक्टरवर काम सुरू करून लोकशाहीचे धिंडवडे काढत चिंधीगिरी सुरू केली आहे. मद्य आणि मटनाचा शौकीन हा पत्रकार आणि त्याचा मित्र पोलीस पुत्र हिंदी वाहिनीचा पत्रकार मुळात तो त्याचा कंपाऊंडर असे हे दारु मिळविण्यासाठी आणि मटन खाण्यासाठी पत्रकारीता करत आहेत. डॉक्टर आणि कंपाऊंडरची जोडी जिल्हाभरात प्रसिध्द आहे. दोन वर्षापुर्वी या दोन महान पत्रकारांनी बोगस डॉक्टरांना ब्लॅकमेल करून बरेच पैसे उकळले होते. दारु आणि मटन हीच आमची पत्रकारीता असे हे म्हणत असतात. आजचा दिवस गेला की, उद्याच्या दिवसाची दारु आणि मटन कुठे मिळेल याचाच शोध आजपासूनच सुरू करणे या डॉक्टर कंपाऊंडरचा मुख्य खेळ आहे. दोन दिवसांपुर्वी एका राजकीय पक्षाच्या बैठकीत बैठक पार पडल्यानंतर तेथे हजर असलेल्या दोन महान पत्रकारांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत वाद घातला आणि म्हणाले आम्ही काय छोटे पत्रकार आहोत काय? आम्हाला काय पोर्टलवाले समजता काय? अशी धमकी देवून पैशांसाठी चिंदीगिरी करत हे पत्रकार तेथून परागंदा झाले. असे पत्रकार समाजासाठी घातकच आहेत. इतर चांगल्या(पण दाढीसारखे नव्हे) पत्रकारांनी दारु आणि मटनामुळे पत्रकार या शब्दाची बे अबु्र होत आहे. याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे.