नांदेड :- शहरातील नगीना घाट परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये गणेश संतोष डोंगरे (वय 19 वर्षे) आणि रणवीर यशवंत शिंगाडे (वय 14 वर्षे) या दोघांचा समावेश आहे. दोघेही नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश व रणवीर हे नगीना घाट परिसरात गोदावरी नदीकाठी गेले होते. यावेळी नदीपात्रात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे खोब्रागडे नगर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलिस अंमलदार अत्तवाड हे करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,009 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अखेर इराणने अमेरिकेला सरेंडर करायला लावलेच;पण ट्रम्पने नवीन काही करू नये पाण्यासाठी नगरसेवक पोलीस अधिकाऱ्याच्या पायावर डोके ठेवतो