तीन आठवडयांत (1215) गुन्हे दाखल, 16 कोटी 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम

 दिनांक 01 ते 31 मे, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका/जुगार, अवैध दारु विक्री, अवैध शस्त्र व इतर अवैध व्यवसायांचे विरोधात मोहीम उघडली आहे. सदर मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 21 मे, 2026 दरम्यान संपलेल्या तिसऱ्या आठवड्यात, नांदेड परिक्षेत्रात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (22), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (261), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (710)  व शस्त्र अधिनियमाअन्वये (62), तर इतर अधिनियमाखाली (160), अशा एकूण (1215) कारवाया करुन (1652) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 16,54,37,344/-  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परिक्षेत्रातील विविध घटकांनी या संदर्भात केलेली कारवाई पुढील प्रमाणे :

जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस  
गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या
नांदेड 9 50,52,692 12 92 42,35,010 281 234 28,38,008 251 41 44,46,800 54 37 9,32,78,422 95
परभणी 7 81,375 11 49 7,71,156 82 99 10,45,800 103 8 2,09,400 11 19 1,99,69,912 33
हिंगोली 2 10,11,840 2 41 2,76,820 63 138 2,91,635 140 6 70,800 7 44 1,06,18,351 49
लातूर 4 14,12,910 7 79 19,30,265 137 239 23,47,560 240 7 2,300 7 60 1,55,46,288 67
एकुण 22 75,58,817 32 261 72,13,251 563 710 65,23,003 734 62 47,29,300 79 160 13,94,12,973 244

परिक्षेत्रात सुरू असलेली अवैध व्यवसाय विशेष मोहीम ही पुढील आठवड्यात आणखी व्यापकपणे राबविण्यात येणार आहे.

खबर हेल्पलाइनचा वाप करा : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!