नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने इलेक्ट्रिक दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल ३ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चार विधीसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७१/२६ अन्वये भादंवि कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२६ रोजी मालेगाव रोडवरील कृष्णा ट्रेडर्स या इलेक्ट्रिक दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक साहित्य चोरी केले होते. याबाबत २१ मे रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मालेगाव रोड परिसरात सापळा रचून संशयितांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले इलेक्ट्रिक साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात गणेश साहेबराव नवकलवाड, वैशाली रामचंद्र नवकलवाड आणि सावित्रीबाई प्रकाश पानकोटे (सर्व रा. नंदी नगर, मुखेड, जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच चार विधीसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक महेश माळी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी विनोद देशमुख,नरेश वाडेवाले,पोलीस अंमलदार विशाल माळवे,विष्णुकांत,सुधाकर मलदोडे,राहुल लाठकर,नागनाथ चापके,राजीव घुले,अदनान पठण,अंकुश कांबळे,महिला पोलीस गुळवे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,109 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सऊदी अरब की अमरीका को चेतावनी हज यात्रा पूरी होने तक हमला ना करे विम्यासाठी एका नायकाला व्हिलन ठरवले: एअर इंडिया १७१ दुर्घटनेचे विदारक सत्य