नांदेड (प्रतिनिधी)-शिवाजीनगर परिसरात अवैध मटका व्यवसाय पुन्हा एकदा जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. शहरातील विविध भागांत खुलेआम मटका घेतला जात असून, संबंधितांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी दिवसाढवळ्या मटका पावत्या फाडल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी मटका अड्डे सुरू असून, काही चालकांनी आपले जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. युवक आणि कामगार वर्गाला सहज पैशाचे आमिष दाखवून या अवैध व्यवसायाकडे आकर्षित केले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मटका व्यवसायामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास खतपाणी मिळत असल्याची चर्चा असून, पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे. मात्र, वारंवार तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने शिवाजीनगर पोलिसांचा मटका चालकांकडे कानडोळा असल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने या अवैध व्यवसायाकडे विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मटका अड्ड्यांवर धाडसत्र राबवून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच परिसरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई केल्यास परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 337 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम; एका दिवसात ३.१० कोटींचा मुद्देमाल जप्त; ६४ कारवाया खत कमी वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहान म्हणजे मोठे षडयंत्र