नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रात १ मे ते ३१ मे २०२६ दरम्यान सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये तब्बल ३ कोटी १० लाख २१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेच्या १८ व्या दिवशी पोलीस उपमहानिरीक्षकांच्या अधिपत्याखालील विशेष पथकाने नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे हुुस्सा येथील वाळूघाटावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ५ हायवा, एक टिपर, जेसीबी मशीन, इंजिन बोट आणि ५० ब्रास वाळूसह तब्बल २ कोटी ३६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुंटूरच्या वाळू प्रकरणात राजु प्रल्हाद हंबर्डे रा. हुस्सा ता. नायगाव, कुंटूर, नांदेड, महाराष्ट्र, माधव रुक्माजी अकमवाड रा. भोसि ता. भोकर, जि. नांदेड, महाराष्ट्र, योगेश दिगांबर हिवराळे रा. राहेर ता. नायगाव, कुंटूर, नांदेड, महाराष्ट्र,प्रकाश संभाजी सूर्यवंशी रा. हळद्या ता. कंधार, जि. नांदेड / उस्मान नगर, नांदेड, महाराष्ट्र, पवनराज होसाजी शिंदे रा. अंतरगाव ता. नायगाव, कुंटूर, नांदेड, महाराष्ट्र, दत्ताहरी भुजंग हिवराळे रा. कोळगाव ता. बिलोली, जि. नांदेड, महाराष्ट्र,सदाशिव लक्ष्मण मंत्रीवाड रा. पहाडगल्ली, उमरी, जि. नांदेड, महाराष्ट्र,गोविंद गुलाब जाधव रा. सातेगाव ता. नायगाव, कुंटूर, नांदेड, महाराष्ट्र,प्रशांत यदुराज जाधव रा. सातेगाव ता. नायगाव, कुंटूर, नांदेड, महाराष्ट्र,चंद्रकांत बालाजी पंडीलवाड रा. टाकळी (बु.) ता. नायगाव, जि. नांदेड, महाराष्ट्र असे १० आरोपीत आहेत. दरम्यान, परिक्षेत्रात सुरू असलेल्या मोहिमेत मटका-जुगार खेळणाऱ्या व चालविणाऱ्या २१ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून २ लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या ३७ जणांविरुद्ध ३७ गुन्हे नोंदवून २ लाख २७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळू उपसा प्रकरणी आणखी दोन गुन्हे दाखल करून २५ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय शस्त्र अधिनियमांतर्गत एक, कोटपा कायद्यांतर्गत दोन आणि इतर विविध कायद्यांखाली कारवाया करण्यात आल्या. एकूण ६४ कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांना थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ नावाची हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 985 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हवामान विभागाच्या सूचना ;जिल्ह्यात 20 मे रोजी येलो अलर्ट जारी शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत मटका जोरात; पोलिसांचा कानडोळा असल्याची चर्चा