बदल्यांची सुगी सुरू आहे. पण दलाल, मोदक प्रक्रिया महत्वाची पण आहे

नांदेड(प्रतिनिधी)-मे 2026 या महिन्याचा तिसरा आठवडा सुरू आहे. 31 मे पर्यंत बदल्यांसाठी सुगीचा काळ असतो. त्याची काही उदाहरणे आम्ही वरिष्ठ पातळीवर पाहिलेली आहेत. आता हा प्रकार जिल्हास्तरावर होणार आहे. दाखवतांना तर हे दाखवले जाते की, बदल्यांच्या प्रकरणांमध्ये संबंधीत व्यक्तीच्या गरजेप्रमाणे आणि उपलब्ध असलेल्या संख्याबळाप्रमाणे नवीन बदलीचे ठिकाण मिळेल. पण यात सर्वात मोठा प्रश्न मोदकांचा आणि दलालांचा आहे.
मे महिन्याच्या 31 तारेखपर्यंत सर्वच बदल्या पुर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते. तसा कायदा पण आहे. कधी-कधी जूनच्या पहिल्या आठवड्यात बदल्या होता. परंतू 31 मे चे काही जावक क्रमांक रिकामे ठेवले जातात आणि जूनमध्ये बदल्या करून त्या 31 मेच्या जावक क्रमांकाने प्रसिध्द होतात. का अशा ऍडजेसमेंटची गरज आहे. याचा अर्थ असा आहे की, नक्कीच काही घोटाळापण होत आहे. दाखवतांंना तर भरपूर काही दाखवले जाते. पण प्रत्यक्षात तसे काही घडत नाही. सन 2016 मध्ये नांदेडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात मात्र तत्कालीन पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी शंभर बदली मागणाऱ्यांना एकदाच उभे करून ते मागत आहेत त्या ठिकाणी उपलब्ध असलेली संख्या दाखवून त्यांच्या बदल्या केल्या आहेत. इतरही लोक असेच दाखवतात. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. आजही पोलीस अधिक्षक कार्यालयात तर असे अनेक पोलीस आहेत. जे पोलीस म्हणून भरती झाल्यानंतर आजपर्यंत पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या बाहेरच गेले नाहीत. अनेक जण अडचणी दाखवतात. त्यांच्या अडचणी कधीच ऐकल्या जात नाहीत. त्यांच्या अडचणी ऐकल्या नाहीत तर ते दिलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी कसे मन लावून काम करतील. याचा सुध्दा विचार होण्याची गरज आहे.
एखाद्या शिक्षकाला सिंदखेड जवळ तेलंगणाच्या सिमेला लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नियुक्ती मिळाली आणि त्याचे गाव लोहा तालुक्यातील माळेगाव जवळ असेल तर विचार करा त्याचे अंतर किती होईल. मग त्याचे कुटूंबिय माळेगावला आणि नोकरी 200 किलो मिटर दुर. कसा मनलावून काम करेल तो शिक्षक. त्याला भविष्य घडवायचे आहे. पण त्याचे वर्तमान अंधारात पाठविण्यात आले आहे आणि भविष्य घडविण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली आहे. म्हणूनच तो मग मोदक आणि दलाल यांच्या मागे ल ागतो. आपल्या वेतनातून काही पैसे खर्च करतो आणि आपल्याला हवी ती नियुक्ती मिळवतो.
नांदेड जिल्ह्यात काही गावे, काही ठिकाणे अशी आहेत की, ती मलाईदार मानली जातात. या मलाईदार ठिकाणी नियुक्ती पाहिजे तर त्यासाठी सुध्दा पुन्हा प्रक्रिया तिच आहे. जी दलाल आणि मोदकांच्या माध्यमातून राबवली जाते. कधी तरी बंद होईल का ही पध्दत कारण या पध्दतीमुळे मागच्या वर्षी 2025 च्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये सर्वसाधारण बदल्यांची यादी एकत्रित न काढतात एका-एका व्यक्तीचा आदेश काढल्याचा प्रकार घडला आहे. का असे एक-एक व्यक्तीचे आदेश काढावे लागले. म्हणजे नक्कीच काही तरी भानगड होती. आपली वागणूक ही खुल्या पुस्तकाप्रमाणे असावी. ती कोणालाही वाचता यावी आणि त्यातील गुणदोषांवर कोणालाही प्रश्न विचारता यावा, शाब्बासकी देता यावी अशीच पुस्तक जर ठेवली गेली तर त्या व्यक्तीचा आदर त्यांच्या मृत्यूनंतर सुध्दा होत राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!