नांदेड (प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल 61 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नगर परिसरातील संदीप तंवर व वैशाली तंवर यांनी फिर्यादी जयश्री गजानन कदम (वय 28, रा. आबानगरी, ता. पूर्णा, जि. परभणी, सध्या वास्तव्यास अभिजीतनगर, नांदेड) यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आरोपींनी संगनमत करून 2 मे 2023 ते 12 जून 2024 या कालावधीत विविध कारणे सांगून फिर्यादींकडून वेळोवेळी मोठी रक्कम घेतली. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता आरोपींनी फिर्यादीची तब्बल 61 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 209/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 409, 34 तसेच अनियमित ठेव योजना बंदी कायद्याअंतर्गत कलम 21, 22 व 23 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घडबे करीत आहेत Kanthak Suryatal Post Views: 1,051 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण राहुल गांधींनी सीबीआय संचालकांच्या निवड प्रक्रियेला दिलेले आव्हान: लोकशाही आणि संस्थात्मक स्वायत्ततेचा संघर्ष