नांदेड,(प्रतिनिधी)-धुळवडीच्या दिवशी काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या देशी दारूच्या 1440 बाटल्या आणि एक टाटा सुमो गाडी स्थानिक गुना शाखेच्या पथकाने मारतळा ते उस्माननगर रस्त्यावर पकडली आहे.
आज धुळवळीच्या दिवशी काळा बाजारात दारू विक्री केल्या जाते यावर जरब ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक काल रात्री गस्त करत असताना पथकाला उस्माननगर ते मारतळा रस्त्यावर रात्री 8.30 वाजेच्या सुमारास टाटा सुमो गाडी क्रमांक एम एच 26 आर 0777 दिसली. या गाडीत पोलिसांना देशी दारू भिंगरी नावाच्या 180 एम एलच्या 1440 बाटल्या भेटल्या या बाटल्यांची किंमत 1 लाख 800 रुपये आहे. सोबतच ज्या गाडीतील चालक अण्णाराव श्रीहरी जाधव याच्या ताब्यातील 5 लाख रुपये किमतीची टाटा सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी उस्माननगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर दारूबंदी अधिनियमानुसार अण्णाराव जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही करताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्यासोबत पोलिस अंमलदार गंगाधर कदम, मारुती तेलंग, मोरे, गणेश धुमाळ, राजबंशी, जाधव आणि शेख आदींनी ही कार्यवाही पूर्ण केली आहे पकडलेला आरोपी, चार चाकी गाडी आणि 1440 देशी दारूच्या बाटल्या उस्मान नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आदींनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.