नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम
नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.
मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी नांदेड परिक्षेत्रात, गुटखा विक्री करणाऱ्या एका इसमाकडून रुपये 1,05,986/- रुपये किंमतीचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाईचा खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्यास दहा वर्षेपर्यंत कैद व द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे.
त्याचप्रमाणे, दिवसभरात मटका-जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण (37) इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (7) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 7,11,880/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, अवैध दारू विक्री करणाऱ्या (63) आरोपींविरुद्ध (62) गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 5,06,300/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच, शस्त्र अधिनियमान्वये (3), कोटपा अन्वये (5), तर इतर अधिनियमाखाली मिळून, एकूण (79) कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 16,36,731/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर येथील अधिकारी व अंमलदारांनी भाग घेतला.
‘खबर’ हेल्पलाइन वर तक्रारदारांचा विश्वास : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर‘ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर हेल्पलाइनवर नागरिकांनी विश्वास दर्शविला असून, परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी सदर हेल्पलाइनची मोठी मदत होत असल्याचे, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आ
